Posts

डोंगरगाव ता. मुखेड येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न...

Image
  डोंगरगाव ता. मुखेड येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न... कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मुखेड व संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरगाव तालुका मुखेड येथे "उन्हाळी भुईमूग व सोयाबीन बीजोत्पादन उत्पादकता वाढीसाठी" किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला. या उन्हाळी हंगामामध्ये डोंगरगाव तालुका मुखेड येथे मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमूग व बीजोत्पादनासाठी सोयाबीन लागवड झालेली आहे, परंतु कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व कृषी विभाग मुखेडचे कृषी पर्यवेक्षक श्री घुगे व तालुका तंत्र व्यवस्थापक श्री जायभाये यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने उन्हाळी पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कृषी विभाग विभागाच्या विविध योजना, कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी गावातील महिला शेतकरी व युवा शेत...

रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण

Image
रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे उत्कर्ष लर्निंग सेंटर आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विज्ञामानाने ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि शेतकार्यानसाठी तीन दिवसीय रहिवाशी रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदरील प्रशिक्षणा अंतर्गत युवकांना रोपवाटिका उभारण्यासाठी लागणारे पॉली हाउस आणि शेडनेट या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली तसेच भाजीपाला आणि फळपिक रोपे निर्मिती आणि व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान नांदेड जिल्यातील व्यावसायिक भाजीपाला तसेच फळरोपवाटीकेस भेट देण्यात आली व रोपवाटिका व्यवस्थापनमधील विवध बाबींची माहिती घेण्यात आली. #NABARD #farmer #rural #youth #agritech #agricultural #agri #narsary #plantation #plantmedicine #plant #vegetableseeds #vegetable #greenhouse

उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी...

Image
उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी... राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक 10 हेक्टर 25 शेतकऱ्यांच्या शेतावर मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे राबवण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण श्री मधुकर घुगे यांच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. वरील प्रात्यक्षिकाची पेरणी 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांनी केली. पीक अतिशय उत्कृष्ट आले असून सध्या 1.5 ते 2 महिन्याचे आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.कपिल इंगळे व सहकारी श्री तुकाराम मंत्रे त्यांनी प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पिक पाहणी केली व शेतकऱ्यांना पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पीक संरक्षण निविष्ठा बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच त्यांच्या जमीन पत्रिकेचे विश्लेषण करून माहिती देण्यात आली. #soil #soilhealthcard #kvk ​​ #sagroli #nanded ​​ #krushived #farm #farmer #agriculture ...

Gender equality today for sustainable tomorrow.. शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता..

Image
  Gender equality today for sustainable tomorrow.. शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता.. 'भविष्य शाश्वत आणि सुरक्षित करायचे असेल तर स्त्री पुरुष समानता हवी" अशी थीम यंदाच्या म्हणजेच 2022 च्या जागतिक महिला दिनाची आहे. याच थीम वर आधारित संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम यांच्या संयुक्त विदयमाने कटकळंबा ता. कंधार येथे दि. 5/3/2022 रोजी महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात स्त्री पुरुष समानतेचे महत्व या विषयावर सौ. मेघाली खिरपावार यांनी माहिती सांगितली . तसेच कंधार तालुक्यातील उमेद अभियान व्यवस्थापक श्री. चीलगर सर यांनी बचत गट सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केवळ व्याख्यानातूनच नाही तर बेटा बेटी एक समान ह्या नातिकेतून आणि नारी शक्ती या अतिशय सुंदर आणि प्रभावी गाण्यातून छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सागरोली येथील सर्व महिला शिक्षिकांना समाजीक संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचा प्रभाव खुप छान पहिला मिळाला, गावातील लोकांनी पुन्हा एकदा हाच कार्यक्रम घेण्यात यावा ...