Posts

Showing posts from March, 2022

उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी...

Image
उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी... राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक 10 हेक्टर 25 शेतकऱ्यांच्या शेतावर मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे राबवण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण श्री मधुकर घुगे यांच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. वरील प्रात्यक्षिकाची पेरणी 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांनी केली. पीक अतिशय उत्कृष्ट आले असून सध्या 1.5 ते 2 महिन्याचे आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.कपिल इंगळे व सहकारी श्री तुकाराम मंत्रे त्यांनी प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पिक पाहणी केली व शेतकऱ्यांना पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पीक संरक्षण निविष्ठा बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच त्यांच्या जमीन पत्रिकेचे विश्लेषण करून माहिती देण्यात आली. #soil #soilhealthcard #kvk ​​ #sagroli #nanded ​​ #krushived #farm #farmer #agriculture ...

Gender equality today for sustainable tomorrow.. शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता..

Image
  Gender equality today for sustainable tomorrow.. शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता.. 'भविष्य शाश्वत आणि सुरक्षित करायचे असेल तर स्त्री पुरुष समानता हवी" अशी थीम यंदाच्या म्हणजेच 2022 च्या जागतिक महिला दिनाची आहे. याच थीम वर आधारित संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम यांच्या संयुक्त विदयमाने कटकळंबा ता. कंधार येथे दि. 5/3/2022 रोजी महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात स्त्री पुरुष समानतेचे महत्व या विषयावर सौ. मेघाली खिरपावार यांनी माहिती सांगितली . तसेच कंधार तालुक्यातील उमेद अभियान व्यवस्थापक श्री. चीलगर सर यांनी बचत गट सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केवळ व्याख्यानातूनच नाही तर बेटा बेटी एक समान ह्या नातिकेतून आणि नारी शक्ती या अतिशय सुंदर आणि प्रभावी गाण्यातून छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सागरोली येथील सर्व महिला शिक्षिकांना समाजीक संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचा प्रभाव खुप छान पहिला मिळाला, गावातील लोकांनी पुन्हा एकदा हाच कार्यक्रम घेण्यात यावा ...

Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - visited

Image
Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - visited Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - Principal Scientist Farm Power and Machinery Dr Ravishankar, Scientist Engg. Ashish Dimate, Dr. Yadgiri Technical officer (FPM) Visited SSM's- Krishi Vigyan Kendra, Sagroli Also, team Interacted with our farmers regarding the use of BBF Technology in our area, we coordinated their visit to village Belkoni Tq. Biloli and Kamta Tq. Ardhapur. Crida #farmers #crida2022 #crida #agricultural #agricultureandfarming #dryland #research #ResearchChallenge #researchpaper #institute #scientist #farm #BBF #technology # #machinery

कोरफड, ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे

Image
कोरफड, ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे सहसा दुर्लक्षित असणारी, कोरड्या व उष्ण हवामानात, माळरान, डोंगर उतार कोठेही सहज उगवणारी वनस्पती म्हणजे कोरफड. ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे. म्हणूनच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनंमध्ये हीचा वापर केला जातो. कोडफडीची प्रक्रिया करून साबण, शाम्पू, तेल, जेल असे अनेक प्रकारची प्रसाधने तयार सहज केली जाऊ शकतात. महिला बचत गटांसाठी गृह उद्योगाची एक चांगली सुरुवात यातून होवू शकते. म्हणूनच १० दिवसांचे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या गृह विज्ञान विभागामार्फत कोरफडी पासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणात कोरफड काढणी, त्याचा अर्क निर्मिती आणि त्यापासून साबण, शाम्पू, जेल, तेल असे विविध प्रकारचे उत्पादनांची प्रत्यक्ष प्रक्रिया करून दाखवण्यात आली. धर्माबाद आणि बिलोली तालुक्यातील उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांचा आणि युवकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास होता. #women #womenempowement #WomensDay2022 #womeninbusiness #womensupportingwomen #womenempoweringwomen...