Posts

Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - visited

Image
Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - visited Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team - Principal Scientist Farm Power and Machinery Dr Ravishankar, Scientist Engg. Ashish Dimate, Dr. Yadgiri Technical officer (FPM) Visited SSM's- Krishi Vigyan Kendra, Sagroli Also, team Interacted with our farmers regarding the use of BBF Technology in our area, we coordinated their visit to village Belkoni Tq. Biloli and Kamta Tq. Ardhapur. Crida #farmers #crida2022 #crida #agricultural #agricultureandfarming #dryland #research #ResearchChallenge #researchpaper #institute #scientist #farm #BBF #technology # #machinery

कोरफड, ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे

Image
कोरफड, ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे सहसा दुर्लक्षित असणारी, कोरड्या व उष्ण हवामानात, माळरान, डोंगर उतार कोठेही सहज उगवणारी वनस्पती म्हणजे कोरफड. ही दुर्लक्षित वनस्पती औषधी गुणधर्मांचा खजाना आहे. म्हणूनच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनंमध्ये हीचा वापर केला जातो. कोडफडीची प्रक्रिया करून साबण, शाम्पू, तेल, जेल असे अनेक प्रकारची प्रसाधने तयार सहज केली जाऊ शकतात. महिला बचत गटांसाठी गृह उद्योगाची एक चांगली सुरुवात यातून होवू शकते. म्हणूनच १० दिवसांचे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या गृह विज्ञान विभागामार्फत कोरफडी पासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणात कोरफड काढणी, त्याचा अर्क निर्मिती आणि त्यापासून साबण, शाम्पू, जेल, तेल असे विविध प्रकारचे उत्पादनांची प्रत्यक्ष प्रक्रिया करून दाखवण्यात आली. धर्माबाद आणि बिलोली तालुक्यातील उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांचा आणि युवकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास होता. #women #womenempowement #WomensDay2022 #womeninbusiness #womensupportingwomen #womenempoweringwomen...

शेतकरी संशोधक विकसित हरभरा वाण सलेक्शन1++ पीक पाहणी कार्यक्रम

Image
शेतकरी संशोधक विकसित हरभरा वाण सलेक्शन1++ पीक पाहणी कार्यक्रम संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी विभाग धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "शेतकरी संशोधक विकसित हरभरा वाण सलेक्शन1++ पीक पाहणी कार्यक्रम व शेती दिन" मौजे बाभळी ता. धर्माबाद येथील प्रयोगशील शेतकरी श्री अशोक दमकोंडवार यांच्या शेतावर घेण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक श्री पंजाब डक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा नांदेड श्री रविशंकर चलवदे व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे होते. हवामान अभ्यासक श्री पंजाब डक यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित शेती तसेच हवामान अंदाज, गारपीट, चक्रीवादळ व वीज पडणे इत्यादी हवामान संकल्पना शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या .श्री रविशंकर चलवदे त्यांनी नांदेड जिल्हा सोयाबीन व हरभरा बिज उत्पादनामध्ये अग्रेसर व आत्मनिर्भर असल्याचे सांगितले व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शेतकरी लाभाच्या ,शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांसाठी योजना सविस्तर मांडल्या. कृषी...

शेतकर्यांनी घेतले विविध सुगंधी वनस्पती लागवड व डिस्टिलेशन युनिट उभारणीचे धडे.....

Image
  शेतकर्यांनी घेतले विविध सुगंधी वनस्पती लागवड व डिस्टिलेशन युनिट उभारणीचे धडे..... संस्कृती संवर्धन मंडळ उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून "विविध सुगंधी वनस्पती लागवड व डिस्टिलेशन युनिट उभारणी"या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उपकेंद्र अटकळी तालुका बिलोली येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले .या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध सुगंधी वनस्पती ज्यात जिरेनियम , सिट्रोनेला, लेमनग्रास, वाळा, दवणा इत्यादी पिकांची लागवड व प्रक्रिया उद्योग उभारणी या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी शेतकऱ्यांनी प्रक्षेत्रावर जिरेनियम पिकापासून प्रत्यक्ष तेलनिर्मिती प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आलेल्या 7.5 एकर प्रक्षेत्रावरील जिरेनियम पिकाची पाहणी शेतकऱ्यांनी केली .या एक दिवसीय कार्यशाळेत सुगंधी वनस्पती लागवड केलेले शेतकरी उद्योजक श्री शिवशंकर धोंडगे बाचोटी ता. कंधार व श्री स्वप्निल बोडके धनज ता. मुखेड यांनी जिरेनियम पिकाविषयी आपले अनुभव कथन केले . कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी "सुगंधी वनस्पती...